Numerology : अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 1 असेल. म्हणजेच, 2 + 8 = 10, 1+0=1. अंकशास्त्रात, गणना मूळ संख्येच्या आधारे केली जाते. मूळ संख्या म्हणजे जन्मतारखेतील अंकांची बेरीज.
आज आपण मूलांक 1 विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला होतो, त्याचा मूलांक 1 असतो. प्रत्येक मूलांकची एक खासियत असते. मूलांक 1 असणारी व्यक्ती निर्भय, निर्भीड असते. हे लोक अतिशय प्रामाणिक असतात. ते स्वाभिमानी आणि निर्भय असतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा ते खंबीरपणे आणि शौर्याने सामना करतात.
हेही वाचा - Valentine Week : 'या' जन्मतारखांची 'जोडी तुटायची नाय', आयुष्यभर बहरत राहील प्रेमाची वेल
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 1 असतो, ते लोक पूर्णपणे स्वावलंबी असतात किंवा तसे होण्यावर भर देतात. त्यांना इतरांवर अवलंबून राहायला आवडत नाही. त्या लोकांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. ते ध्येयप्राप्तीसाठी कठीण परिश्रम घ्यायला नेहमी तयार असतात. ते स्वत:चे नशीब स्वत: घडवतात. असे करणे त्यांना आवडते.
त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण ठासून भरलेला असतो. हे लोक स्वतंत्र विचारांचे असतात. अंकशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, मूलांक 1 असलेल्या व्यक्तीला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. त्यांना नोकरी करायला आवडत नाही. त्यांना व्यवसाय करायला आवडते. ते उच्च शिक्षित असतात. त्यांना प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होते.
अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 असलेल्या व्यक्ती जीवनात भरपूर पैसा कमावतात. त्यांची आर्थिक स्थिती नेहमी उत्तम असते. या लोकांना कधीही धनसंपत्तीची कमतरता जाणवत नाही. या लोकांना त्यांचे कौतुक ऐकायला खूप आवडते. मात्र, याबाबतीत त्यांनी सावध रहावे. कोणती व्यक्ती आपली केवळ समोरून स्तुती करून आपला फायदा घेत नाहीये ना, याकडे या लोकांनी लक्ष ठेवावे.
हेही वाचा - Valentine Day 2025: रोज एखाद्याला मिठी मारल्यास हृदयाच्या आरोग्यावर होतो 'असा' परिणाम
हे लोक खूप रोमँटिक असतात. या लोकांचे प्रेम संबंध चांगले असतात. यांना संगीत आवडते. या क्षेत्रात ते उत्तम असतात किंवा त्यांना उत्तम गती असते. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस अत्यंत शुभ असतात.