Saturday, August 16, 2025 11:12:30 AM

नाशकात शिवजयंतीचा उत्साह; वाहतूक मार्गात बदल

संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त उत्साह पाहायला मिळतोय. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येतोय.

नाशकात शिवजयंतीचा उत्साह वाहतूक मार्गात बदल

नाशिक:  संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त उत्साह पाहायला मिळतोय. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येतोय. याच पार्शवभूमीवर आता नाशिकमध्ये सिटीलिंक बसच्या सेवेत काही बदल करण्यात आलेय. पोलिस वाहतूक शाखेच्या सूचनांनुसार सिटीलिंक बसच्या काही मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून पास केंद्रही बंद राहणार आहे. यासंदर्भात सिटीलिंक प्रशासनातर्फे माहिती सांगल्यात आलीय. 

हेही वाचा: chhatrapati shivaji maharaj jayanti 2025: सोहळा शिवजन्मोत्सवाचा; शिवनेरीवर उत्साह

 सिटीलिंक प्रशासनाचे आवाहन: 
नवीन सीबीएस येथून सुटणाऱ्या सर्व बसेस या निमाणी बसस्थानकातून सुटतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तसेच प्रवास करण्यापूर्वीच प्रवाशांनी संपूर्ण बसफेरीची माहिती घेऊनच प्रवास करावा. बुधवारी सिटीलिंकचे सर्व पास केंद्रदेखील बंद राहणार आहेत. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवास करतेवेळी प्रवाशांनी कोणतीही समस्या असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान सालाबादाप्रमाणे यंदाही नाशिकमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून  शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गांवर भव्य देखावे सादर केले जाणार जनरेट त्याचबरोबर शहरातील विविध भागांतून जयंती मिरवणुका काढल्या जाणार असल्याने सिटिलीनक प्रशासनाकडून हा वाहतूक बदल करण्यात आलाय. 


सम्बन्धित सामग्री