पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभूल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दीपक मानकरांच्या अडचणी वाढणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभुल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शांतनु कुकडेच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली. यानंतर कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी चौकशीसाठी दिपक मानकला बोलावलं असता त्याने कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली. पोलिसांनी दिपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक मानकर पुण्याचे उपमहापौर राहिले असले तरी ते नेहमीच वादग्रस्त ठरलेत. याआधी अनेक प्रकरणांमध्ये अटक झाल्याने त्यांना तुरुंगवारी घडली आहे.
हेही वाचा : बीडमधील तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून संपवले जीवन; पुण्यात केली आत्महत्या
नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेला अटक करण्यात आली. परदेशी महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याला अटक केली. कुकडेच्या बँक खात्यावरुन कोट्यवधीचे आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झाले. कुकडेच्या सीएच्या खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात पैसे गेल्याचा आरोप होत आहे. मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात पावणेदोन कोटी जमा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कुकडेच्या बँक खात्यात जवळपास 100 कोटी आढळल्याची माहिती आहे. त्यातील 40 ते 50 कोटी रुपये इतरांच्या खात्यावर वळवले असल्याचे समोर आले आहे.