Saturday, June 14, 2025 04:44:20 AM

पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या सुनीताचा मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल

नागपुरातील सुनीता जामगाडे प्रकरणात सुनीताने मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मानसिक विकास असल्याचा दावा तिने केला आहे.

पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या सुनीताचा मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल

नागपूर : नागपुरातील सुनीता जामगाडे प्रकरणात सुनीताने मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मानसिक विकास असल्याचा दावा तिने केला आहे. आता सोमवारी न्यायालयात या प्रकरणातील सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनीताने एलओसी ओलांडून पाकमध्ये प्रवेश केला होता. 

भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या सुनीता जामगडेने मानसिक परीक्षणासाठी जेएमएफसी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सुनीता जामगडेने एलओसी क्रॉसकरून पाकिस्तानमध्ये गेल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानात तिची चौकशी करून भारताला सोपविण्यात आले. 28 मे पासून सुनीता नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून सध्या न्यायालयीन कोठडीत नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. सुनीताने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात अर्ज सादर केला असून मागील तीन-चार वर्षापासून मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे अर्जात नमूद केलेले आहे. त्यामुळे मानसिक परीक्षणासाठी न्यायालयात अर्ज सादर करत त्यावर सुनावणीची मागणी तिने केलेली आहे. न्यायालयाकडून याप्रकरणी सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास सुनीताची वैद्यकीय तपासणी मानसोपचार तज्ञांकडून केली जाणार असल्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर 

सुनीताने अवघ्या दोन तासात एलओसी पार केली होती. गुगल मॅपच्या सहाय्याने ती पाकिस्तानात गेल्याचे समोर आले होते. सुनीता इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या संपर्कात होती. पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीशी तिचा संपर्क होता. तसेच सुनिताच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले होते. पाकिस्तान प्रवेश करण्यामागे कारण व्यक्तिगत आहे की यामध्ये मोठे रॅकेट आहे. याबाबत सुद्धा तपास यंत्रणा तपास करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत सुनीताने कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचे संकेत मिळाले नाहीत.
 


सम्बन्धित सामग्री