नागपूर: सध्या सोशल मीडियावर Ghibli फोटो ट्रेंड प्रचंड गाजतोय. अनेकांनी OpenAI च्या नावाने व्हायरल झालेल्या Ghibli AI आर्ट जनरेटरचा वापर करून आपले AI रूपांतरण फोटो तयार केले आहेत. हे फोटो खरंच सुंदर, आकर्षक वाटतात आणि लोक मोठ्या उत्साहाने शेअरही करत आहेत. मात्र, या चमकदार ट्रेंडच्या आड एक काळोखी बाजूही समोर आली आहे आणि ती आहे सायबर फसवणुकीची!
नागपूरसारख्या शहरांमध्ये आता यासंबंधी सायबर क्राईम च्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. काही सायबर गुन्हेगारांनी Ghibli फोटो तयार करण्यासाठी बनावट लिंक तयार केल्या आहेत. या लिंकमध्ये वापरकर्त्यांकडून त्यांचा मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, आणि इतर गोपनीय माहिती मागवली जाते. 'फोटो तयार करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे,' असं सांगून लोकांना फसवलं जातं.
हे घडल्यावर, काही वेळातच बँक खात्यांमधून पैसे गायब होऊ लागतात. काहींच्या मोबाईल नंबरवर अॅक्सेस मिळवून OTP चा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
Ghibli ट्रेंडमुळे काय धोके आहेत?
बनावट लिंकद्वारे फसवणूक
मोबाईल नंबर आणि बँक माहिती मागवली जाते
OTP आणि UPI पिन चोरण्याचा प्रयत्न
बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जातात
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
कोणतीही लिंक उघडण्याआधी ती खरी आहे का हे तपासा
आपल्या बँकेची माहिती कोणालाही देऊ नका
अज्ञात अॅप्स/वेबसाईट्सवर लॉगिन करू नका
झाल्यास तात्काळ सायबर क्राइमला तक्रार नोंदवा