Sunday, August 17, 2025 04:49:48 AM

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; जामीन अर्जाला पोलिसांकडून विरोध

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ जामीन अर्जाला पोलिसांकडून विरोध

आमिर हुसैन. प्रतिनिधी. बीड: बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र, बीड पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध केला आहे. 'या प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर झाल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे, प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये', असा युक्तिवाद पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती

नेमकं प्रकरण काय?

माहितीनुसार,  बीड शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्या दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. सध्या, ते दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणासोबतच अ‍ॅट्रॉसिटीसह पॉक्सोचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याचा तपास पोलिस उपअधीक्षक करत आहेत. या घटनेमुळे, बीड शहरात खळबळ उडाली असून, पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


सम्बन्धित सामग्री