मनोज दयाळकर. प्रतिनिधी. मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील दोन महिन्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यादरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याच्या सूचना देण्यात आला आहे.
हेही वाचा: ठाकरे गटाचा 9 जूनला मेळावा होणार; आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार
तसेच, कार्यकर्त्यांमार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. या बैठकीत, राज्य सरकार आणि केंद्राच्या अनेक लोकापयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.