Sunday, August 17, 2025 01:41:49 PM

'घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे' - मुख्यमंत्री फडणवीस

'ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.

घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: 'दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून एकूण 8 प्रवासी पडले आणि त्यापैकी काहींचा अपघातात मृत्यू झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी पडले खाली

काय म्हणाले मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी?

'घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात आहे', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. 'त्याचप्रमाणे, या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही', अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी स्पष्ट केले. 'हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले', असं लीला यांनी सांगितले आहे. हे प्रवासी एक्स्प्रेसमधून नेमके कसे पडले? हे प्रवासी एक्सप्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.


सम्बन्धित सामग्री