रवींद्र कोकाटे. प्रतिनिधी. रत्नागिरी: पुण्यातील हगवणे प्रकरण समोर असतानाच रत्नागिरीतील गुहागरमधील देवघर येथील सासऱ्याची हैवानी वृत्ती समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून सासऱ्यानेच सुनेवर अतिप्रसंग केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रसंगी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे. तसेच, सासऱ्याकडून केवळ 21 वर्षीय सूनेचा विनयभंग करण्यात आला आहे. गेल्या वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून 21 वर्षीय सुनेने सासऱ्यासह त्यांना पाठिशी घालणाऱ्या सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुहागर तालुक्यातील देवघर, झोंबडी परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं सुरूच; 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून 21 वर्षीय सुनेने सासऱ्यासह त्यांना पाठिशी घालणाऱ्या सासू आणि नणंद यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुनेने तक्रार दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या ऍडव्होकेट सायली दळवी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धडक दिली. पुढे, ऍडव्होकेट सायली दळवींचा आरोप आहे की, 'तिच्या सासऱ्याचा दारू व्यवसाय असल्याने पोलिस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत'. मात्र, तीन दिवस होऊनही सासरा मोकाट फिरत असल्यामुळे महिला आयोग अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.