Sunday, August 17, 2025 12:55:52 PM

GHOD DAM PUNE: शिरूरमधील घोड धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.

ghod dam pune शिरूरमधील घोड धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

पुणे: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. धरणातून सध्या घोड नदीपात्रात 4 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून, गेल्या शेकडो वर्षांनंतर पहिल्यांदाच जून महिन्यात धरण एवढ्या मोठ्या क्षमतेने भरल्याने रांजणगाव सारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा शेतकऱ्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. 

हेही वाचा: वारकऱ्यांना आर्थिक मदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

शनिवारी, राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री