Sunday, August 17, 2025 01:49:37 AM

बनावट मालमत्ता पत्रक तयार करून लाटली सरकारी जमीन; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार

कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

बनावट मालमत्ता पत्रक तयार करून लाटली सरकारी जमीन बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार

बुलढाणा: कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. भूमी अभिलेखा अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारी जमीन चोरल्या का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.  

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर हद्दीत कोट्यावधींचे बाजार मूल्य असलेला सरकारी भूखंड भू माफियाच्या घशात घातला गेला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर खामगाव शहरातील भूमाफियांनी कागदपत्रांची अफरातफर करत हा भूखंड लाटला आहे. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी या भूखंड हस्तांतरण विरोधात आक्षेप घेतल्यानंतर संपूर्ण भूखंड हस्तांतरणाच्या प्रकाराचे बिंग फुटले आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जमिनीचा सौदा केला गेला असल्याचा आरोप होतोय. एका साध्या कागदावर जमीन हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली गेली असल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. एका साध्या कागदावर केलेल्या अर्जावर या प्रकरणात मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे. 

हेही वाचा: Vastu Tips: तुम्हाला माहिती आहे का की काही लोकांना दक्षिण मुखी घराचा फायदा होतो? तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या

पंकज घुले नामक भूमाफियाने भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका साध्या कागदावर अर्ज करत आखीव पत्रिका मिळवली. शिवाय नियमबाह्य कागदाची अफरातफर करून मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी जमिनी भूमाफियाच्या घशात घालण्याचा घाट सरकारी अधिकाऱ्यांकडूनच घातला गेला असल्याचा संशय चांगलाच बळावला आहे. जिथे एखादा दस्त नोंदणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे ओटे झिजवावे लागतात. तिथे कागदांची नजरचूक करत जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहारातून हा संपूर्ण घोटाळा घडला असल्याचं पाहायला मिळतंय. 


सम्बन्धित सामग्री