पुणे: पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला आहे. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अंदाजे 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रविवार असल्यानं मोठ्या संख्येने पर्यटक कुंड मळ्यात उपस्थित होते. पुलावर पर्यटक उभे असताना ही दुर्घटना झाली.
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण बुडाले आहेत. हे स्पष्ट होऊ शकलं नाही मात्र अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हेही वाचा : ऑल इज वेल चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा
मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने बारा जण दगावले आहेत. कुंडमळा पूल कोसळला असल्याने दुर्घटना घडली आहे. या पूलामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.