नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. भाजपाची दारं सर्वांसाठी खुली असल्याचा संकेतही महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच भाजपातील वरिष्ठ नेते बडगुजर यांना घेण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे. पक्षाचे दार सर्वांसाठी खुले आहेत असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी संकेत दिल्याने या सुरू झाल्या आहेत. आमदार सीमा हिरे यांनी आताच त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचा राग स्वाभाविक आहे. मात्र त्यांची देखील समजूत काढली जाईल असे म्हणत बावनकुळे यांनी म्हटले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात सुधाकर बडगुजर यांची पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पातळीवर सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेण्यास विरोध होत असला तरी वरिष्ठ पातळीवर मात्र बडगुजर यांच्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर होणार
बडगुजर यांची कारकीर्द
2008 पासून सुधाकर बडगुजर शिवसेनेत कार्यरत आहेत. सिडको भागातून अनेकदा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. गटनेते, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता म्हणूनही जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. 2014 आणि 2024 मध्ये भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून पराभव त्यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख बडगुजर यांची आहे. सुधाकर बडगुजर यांच्या भाजपातील एन्ट्रीनंतर पक्षाला ओबीसी चेहरा मिळणार आहे. त्यामुळे आता सिडको भागात पक्षाची ताकद वाढणार आहे.