Saturday, June 14, 2025 03:53:54 AM

पैठण तालुक्यात 2 वाहनांसह 31 म्हशींची पाचोड पोलिसांकडून सुटका

जनावरांची अत्यंत निर्दयीपणे आणि अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली आहे.

पैठण तालुक्यात 2 वाहनांसह 31 म्हशींची पाचोड पोलिसांकडून सुटका

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: जनावरांची अत्यंत निर्दयीपणे आणि अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या मुरमा फाटा येथे शनिवारी रात्री 1 च्या सुमारास आरोपींवर कारवाई झाली.

बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये 27 म्हशी कोंबून भरल्या होत्या, तर दुसऱ्या वाहनात 4 जनावरे होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी तपासणी केली असता, ट्रकमधून जनावरांची अत्यंत निर्दयीपणे आणि अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी कृष्णा भागवत चौधरी (वय: 28, रा. मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड), अजरूद्दीन बावूगीया शेख (रा. परळी रेल्वे, जि. बीड) आणि तनवीर समीर काजी (रा. नागापूर) यांना ताब्यात घेतले.

नेमकं प्रकरण काय?

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथे पाचोड पोलिसांनी नाकाबंदी केली होती. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो येताना पाचोड पोलिसांनी त्याला थांबवले. संशयाने टेम्पोची (क्र. एम.एच. 12 क्यू. डब्ल्यू 3348) पाहणी केली असता 27 म्हशी कोंबून भरलेल्या होत्या, तर दुसऱ्या वाहनात 4 जनावरे होती. ही जनावेरे अत्यंत निर्दयीपणे आणि अवैधरित्या कत्तलीसाठी पाठवली जात होती.

शनिवारी रात्री 1 च्या सुमारास बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने एक आयसर वाहन येताना पाचोड पोलिसांच्या निदर्शनात आले. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवून तपासणी केली. चालकाला विचारले असता, त्याने अनुत्तरदायी उत्तरे दिली. तपासणीमध्ये (क्र. एम.एच. 23 ए.यू. 6376) वाहनात 27 म्हशी आढळल्या. चालकाकडून परवाना नसतानाही म्हशी बेकायदेशीर कत्तलीसाठी नेण्यात आल्याचे उघड झाले.

या दोन्ही कारवाईतून पाचोड पोलिसांनी 31 म्हशी ताब्यात घेतल्या असून, 35 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस कर्मचारी हरीहर नामदेव तांदळे यांच्या तक्रारीवरून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11(घ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाला ताब्यात घेऊन सर्व जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित करत आहेत.


सम्बन्धित सामग्री