Saturday, August 16, 2025 12:05:08 PM

सांगलीत प्रहार संघटनेचं अर्धनग्न आंदोलन; बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवला आहे.

सांगलीत प्रहार संघटनेचं अर्धनग्न आंदोलन बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

सांगली: बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून अनोख्या पद्धतीचा आंदोलन करण्यात आले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचे आमरण उपोषण सुरू असूनही राज्य सरकारकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे, बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, प्रहार संघटनेच्या वतीने शहरातील स्टेशन चौक येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर अर्धनग्न होत धरणे आंदोलन करण्यात आले.  

हेही वाचा: 'सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवावे'; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

या आंदोलनात राजू कदम, अक्षय शिंदे, ओम भोसले, प्रल्हाद माने, श्रीकांत पवार, शिवराज पाटील यांसह इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता. यादरम्यान, राज्य शाशनाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. 'राज्य शासनाने त्वरित बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू', असा इशाराही देण्यात आला. बच्चू कडू यांच्या निषेधार्थ रविवारी जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शनिवारी दिला.

हेही वाचा: ICC World Test Championship Final 2025: भारतात WTC फायनल होणार की नाही?


सम्बन्धित सामग्री