Wednesday, June 18, 2025 03:14:21 PM

PM Kisan Samman Nidhi Yojana : जूनमध्ये येऊ शकतो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता; तुमचं नाव कसं तपासाल आणि ई-केवायसी कशी अपडेट कराल.. ते जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, 6000 रुपयांची आर्थिक मदत, 20व्या हप्त्याची घोषणा जूनमध्ये अपेक्षित.

pm kisan samman nidhi yojana  जूनमध्ये येऊ शकतो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमचं नाव कसं तपासाल आणि ई-केवायसी कशी अपडेट कराल  ते जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपुर येथून या योजनेचा 19वा हप्ता जाहीर केला होता. आता सर्वांची नजर जून महिन्यात अपेक्षित असलेल्या 20व्या हप्त्यावर आहे.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत दिली जाते. 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये आल्यामुळे, 20वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, हप्त्याची अचूक तारीख केंद्र सरकारकडून अधिकृत वेबसाइट किंवा प्रेस नोटच्या माध्यमातूनच घोषित केली जाते.

ई-केवायसी गरजेची

पुढील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरही 'eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers' असे स्पष्ट लिहिलेले आहे. ई-केवायसी करण्याचे दोन मार्ग आहेत –

1. OTP आधारित ई-केवायसी: https://pmkisan.gov.in वर जाऊन

2. बायोमेट्रिक ई-केवायसी: जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) मध्ये जाऊन

वेबसाइटवरून OTP आधारित ई-केवायसी कशी करावी?

1. सर्वप्रथम https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा

2. मुख्यपृष्ठावरील उजव्या बाजूला 'eKYC' या पर्यायावर क्लिक करा

3. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका, 'सर्च' वर क्लिक करा

4. आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर टाका

5. 'Get OTP' वर क्लिक करून आलेला OTP टाका आणि ई-केवायसी पूर्ण करा


पात्र शेतकऱ्यांची यादी कशी तपासावी?

1. pmkisan.gov.in वर जा

2. उजव्या बाजूला 'Beneficiary List' वर क्लिक करा

3. राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा

4. 'Get Report' वर क्लिक केल्यावर आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल, त्यामध्ये आपले नाव तपासा
 

या कारणांमुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो:

1. डुप्लिकेट नावाने अर्ज

2. अपूर्ण ई-केवायसी

3. अपात्र श्रेणीतील शेतकरी

4. चुकीचा IFSC कोड

5. बंद किंवा फ्रीझ केलेले बँक खाते

6. आधार क्रमांक बँकेशी लिंक नसणे

7. आवश्यक माहिती अपूर्ण असणे

8. चुकीचे बँक किंवा पोस्ट ऑफिसचे नाव

9. अकाउंट नंबर चुकीचा किंवा योजनेस अनुरूप नसलेला

10. आधार आणि खाते या दोन्हींची माहिती अमान्य असणे

शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींची खातरजमा करून वेळेवर ई-केवायसी करून घ्यावे, जेणेकरून पुढील हप्ता सहजपणे मिळू शकेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


सम्बन्धित सामग्री