पुणे: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी शहरातील 100 हून अधिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटवर छापा टाकला. या बेकायदेशीर व्यवसायामागे ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ ही तीन नावे आघाडीवर असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. सध्या हे तिघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी विभागीय बैठकीत स्पष्ट केले की, जो अधिकारी या टोळीविरोधात मकोका अंतर्गत प्रभावी कारवाई करेल, त्याला बक्षीस दिले जाईल.
हेही वाचा - Navi Mumbai Crime: अश्लील संभाषण, अर्धनग्न व्हिडीओ सेंड; दहावीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे चाळे
प्राप्त माहितीनुसार, हे तिन्ही मुख्य आरोपी प्रत्यक्ष स्पा सेंटरमध्ये उपस्थित राहत नाहीत. ते बाहेरील व्यवस्थापकांना पुढे करत आपले रॅकेट चालवतात. ज्यामुळे मुख्य गुन्हेगार पोलिसांच्या कारवाईपासून बचावत आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या कारवाईत 15 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी वेश्याव्यवसायात अडकलेली आढळून आली. या मुलीची पुणे पोलिसांनी सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा - Navi Mumbai Crime : विवाहित महिलेशी प्रेमसंबंधांचा संशय, 25 वर्षीय तरुणाची रबाळे तलावात उडी
स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
सोशल मीडियावर या टोळीचा प्रचार ‘थाई मसाज’, ‘बॉडी स्पा’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’ अशा नावांनी केला जात होता. परंतु, आतमध्ये मात्र, काळे कारनामे सुरू असतं. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, 'आता केवळ खालच्या स्तरावरील कारवाई केली जाणार नाही. उलट खऱ्या गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणणे हे प्राधान्य असेल. त्यांनी या टोळीवर मकोकासारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून हे गुन्हेगारी नेटवर्क पूर्णपणे नष्ट करता येईल.'