Wednesday, June 25, 2025 01:45:04 AM

संभाजीनगरच्या महानगरपालिकेत बनावट नोटा उधळणं भोवलं; मनसैनिकावर गुन्हा दाखल

छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना 'महापालिकेला भीक लागली' अशा घोषणा देत बनावट नोटा उधळल्याप्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष नवपुते आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगरच्या महानगरपालिकेत बनावट नोटा उधळणं भोवलं मनसैनिकावर गुन्हा दाखल

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात आंदोलन करताना 'महापालिकेला भीक लागली' अशा घोषणा देत बनावट नोटा उधळल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष चंदू नवपुते, गणेश साळुंके, हेमंत जाधव, अविनाश पोफळे, रवींद्र गायकवाड आणि अन्य दोघांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: 'घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे' - मुख्यमंत्री फडणवीस

या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्याचे हवालदार पांडुरग रमाजी गोरे (वय: 57) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार 6 जून रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन करत महापालिकेच्या पार्किंग धोरणाचा निषेध केला. यावेळी शहर अभियंता फारुख खान यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, या आंदोलनात सहभागी मनसे मध्य विधानसभा अध्यक्ष चंदू नवपुते यांनी आपल्या खिशातून बनावट 500 रुपयांच्या नोटा काढून महापालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर उधळले होते. 

हेही वाचा: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा


सम्बन्धित सामग्री