सोलापूर : सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ॲक्शन मोडवर आले आहेत.
सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर ॲक्शन मोडवर आहेत. रुग्णालयातील ओपीडी, आयपीडीला अचानकपणे भेट देत आहेत. त्यावेळी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात करण्यात येत आहे.
हेही वाचा : लातूरच्या वसतिगृहात तरुणाला बेल्टने मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 11 कर्मचाऱ्यांवर अधिष्ठातांनी कारवाई केली आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर ॲक्शन मोडवर आले आहेत. रुग्णालयातील ओपीडी, आयपीडीला अचानकपणे भेट देत आहेत. यावेळी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात करत आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. संजीव ठाकूर यांनी दिला आहे. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर रात्री अपरात्री थेट वार्डात घुसून विविध समस्यांबाबत रुग्णांशी संवाद साधत आहेत. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी डॉ. ठाकूर यांनी ॲक्शन प्लॅन बनवला आहे. आगामी काळात सातत्याने कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिला आहे.