नाशिक : नाशिकच्या घोटी येथील खाजगी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठवी नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, आणि निरोध सारखे आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र ही घटना जुनी असल्याचे माहिती आता समोर आली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ जुने असल्याची माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुलांना शिस्त लागावी यासाठी शाळा प्रशासनाकडून मुलांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आली होती यात या गोष्टी सापडल्या होत्या,या मुलांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली तसेच त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले होते. नाशिकच्या या विद्यालयाकडून असे विविध उपक्रम घेण्यात येतात. काही दिवसांपूर्वी याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या केशरचने संदर्भात शाळेने कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांची शाळेतच केस कटींग करण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाचे अभिनंदन करण्यासाठी काही पदाधिकारी हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यात त्यांनी शाळेचे उपक्रम दाखविले. त्यातील काहींनी जप्त केलेल्या वस्तूंचे फोटो काढले असे स्पष्टीकरण शाळेचे उपमुख्याध्यापक विवेक पवार यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य सापडल्यानंतर शिक्षकांकडून कडक धोरण राबवण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनप्रमाणे केसांची स्टाईल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापण्यात आले होते.
हेही वाचा : मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी ग्रोथ हब प्रकल्पांच्या कामांना वेग द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या घोटीच्या एका खाजगी शाळेत नववीच्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, कंडोम पाकिट (निरोधक) व तंबाखूजन्य पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापक यांनी अचानक दप्तराची तपासणी केल्याने प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांना सांगत विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. त्याचप्रमाणे चित्रविचित्र हेअर स्टाईल करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपमुख्याध्यापकांनी केस कापले होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढेही तपासणी अशीच चालू राहणार असल्याची माहिती उपमुख्याध्यापकांनी दिली.