Saturday, August 16, 2025 09:30:55 PM

स्थानिक निवडणुकांमध्ये INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीची गरज नाही; संजय राऊत यांचे मोठे विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्थानिक निवडणुकांमध्ये india आघाडी आणि महाविकास आघाडीची गरज नाही संजय राऊत यांचे मोठे विधान
Sanjay Raut
Edited Image

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीची गरज नाही, असं महत्त्वाचं विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया अलायन्सची स्थापना करण्यात आली होती. त्याच वेळी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ - 

संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) आता मुंबई महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना सोबत घेऊ इच्छित नसल्याचं विधान संजय राऊत यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तथापी, असे मानलं जातं की आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संभाव्य मित्रपक्ष म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा मुंबई प्राणीसंग्रहालयात आता राहणार 40 पेंग्विन; BMC वाढवणार कुंपणाचे क्षेत्रफळ

दरम्यान, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'मी असे म्हटले नाही की शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र निवडणूक लढवत आहेत. मी फक्त एवढेच म्हटले आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असा जनतेचा दबाव आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही असे विधान केले होते की उद्धव ठाकरे यांची मुंबईत मजबूत पकड आहे आणि जर त्यांच्याशी युती झाली तर ते फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा - डॅमेज कंट्रोलसाठी जुलै अखेरीस उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा?

उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे गट शिवसेनेवर निशाणा -  

तथापी, या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी तीव्र टीका केली. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, 'आता शिवसेनेला (उद्धव ठाकरे) इंडिया अलायन्सची गरज नाही. यावरून स्पष्ट होते की, उद्धव गट शिवसेना निवडणुकीच्या गरजेनुसार पक्षांचा वापर करते. त्यांना लोकसभेत इंडियाची गरज होती, म्हणून त्यांनी युती केली. आता त्यांना महानगरपालिकेत मनसेची गरज आहे, म्हणून ते त्यांच्याकडे झुकत आहेत. यामुळेच आम्ही त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.'
 


सम्बन्धित सामग्री