Saturday, August 16, 2025 12:21:18 PM

पुण्याहून तीन मुली निघाल्या दुबईला; चेकिंग करतांना धक्कादायक बाब आली समोर

पुणे शहरातून सद्या रोजच धक्कादायक प्रकरण समोर येताय. अशातच आता पुण्यातून तीन तरुणी दुबईला पोहचल्या मात्र चेकिंग करतांना एक धक्कादायक बाब समोर आलीय.

पुण्याहून तीन मुली निघाल्या दुबईला चेकिंग करतांना धक्कादायक बाब आली समोर

पुणे: पुणे शहरातून सद्या रोजच धक्कादायक प्रकरण समोर येताय. अशातच आता पुण्यातून तीन तरुणी दुबईला पोहचल्या मात्र चेकिंग करतांना एक धक्कादायक बाब समोर आलीय. या मुलींची चेकिंग करत असतांना त्यांच्या वहीतून ही धक्कादायक बाब समोर आलीय. या मुलींनी 3 कोटी 34 लाख रुपयांचा कट रचला असल्याचं समोर आलंय. 

हेही वाचा: Pune Shivshahi Bus Case : वसंत मोरेंनी फोडल्या काचा; काय म्हणाले उद्धव ठाकरे

काय आहे प्रकरण? 

परदेशी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींची चौकशी सुरू झाली तेव्हा काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. चौकशीदरम्यान, या तिन्ही मुलींनी त्या महिलेचे नावही सांगितले जिच्या सूचनेवरून या तिघी दुबईला जात होत्या. 

पुणे विमानतळावर तैनात असलेल्या एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाली होती की, एका वहीच्या पानांमध्ये परकीय चलन लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तस्करीत सहभागी असलेल्या तिन्ही मुली विद्यार्थिनी आहेत. तथापि, ही माहिती कस्टम्स एआययूकडे पोहोचेपर्यंत, तिन्ही मुली त्यांच्या वहीसह दुबईला रवाना झाल्या होत्या.

भारतीय अधिकाऱ्यांमार्फत दुबई विमानतळाशी संपर्क साधण्यात आला आणि तिन्ही मुलींना पुण्याला परत पाठवण्याची विनंती करण्यात आली. या तिन्ही मुली दुबई विमानतळावर पोहोचताच, त्यांना पुढील उपलब्ध विमानाने पुण्याला पाठवण्यात आले. पुणे विमानतळावर उतरताच, तिन्ही मुलींना एआययूने ताब्यात घेतले आहे.


सम्बन्धित सामग्री