मुंबई : राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे. विधान परिषदेत बुलढाण्यातील लोकांना टक्कल पडण्याविषयीची खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग नोंदवण्यात आला आहे.
विधान परिषदेत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बुलढाण्यातील लोकांना टक्कल पडण्याविषयी माहिती दिली. ही माहिती खोटी असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते आमदार धीरज लिंगाडे यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यावर हक्कभंग दाखल केला आहे. बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या विषयी विधान परिषदेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी बोर्डीकर यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. रेशनवर मिळणाऱ्या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचे संशोधन पद्मश्री डॉ हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले आहे. पण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मात्र गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहाला दिली. सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हक्कभंग दाखल करून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : Rose Water : देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात महत्त्वाचा युक्तिवाद
बुलढाण्यात नेमकं काय झालं होतं?
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील १८ गावांमध्ये जवळपास ३०० लोकांना केसगळतीची समस्या उद्धभवली होती. पीडितांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरूणांचाही समावेश होता. काही दिवसांमध्ये केसगळतीचे रूपांतर टक्कलमध्ये झाली. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बुलढाण्यातील केसगळतीकडे लागले. आधी दुषित पाण्यामुळे ही समस्या उद्धभवली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र अभ्यासानंतर याचे कारण समोर आले. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या अभ्यासातून विषारी तत्त्व असलेला गहू खालल्यामुळे केस गळती झाल्याचे समोर आले. रेशन दुकानांवरून वाटण्यात येणारा गहू यासाठी जबाबदार असल्याचे डॉ. बावस्कर यांनी अनेक महिने संशोधन केल्यानंतर सांगितले. या गव्हात सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे तर झिंकचे प्रमाण अत्यल्प आहे.
दरम्यान राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी टक्कल पडण्याच्या घटनेविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप आमदार धीरज लिंगाडे यांनी केला. त्यांनी बोर्डीकरांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.