महेंद्र जोईल. प्रतिनिधी. मुंबई: मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजता ते 3 जून रोजी सकाळी 7:30 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही माहिती महानगरपालिकेने जाहीर केली असून, या काळात कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी आणि झडप बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच, महापालिकेच्या आर दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: ठरलं तर मग; वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार बाळाचं संगोपन
यादरम्यान, कांदिवली (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ठाकूर संकुल द्वार येथे 900 मिमी व्यासाच्या पाण्याच्या पाईपला त्याच व्यासाच्या दुसऱ्या पाईपशी जोडण्याचे आणि 900 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच, आर दक्षिण विभागातील ठाकूर व्हिलेज, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा आणि कांदिवली (पूर्व) या सर्व भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामाचा उद्देश पाईपलाईनची दुरुस्ती, सुधारणा आणि भविष्यात अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आहे.
हेही वाचा: आरोपी निलेश चव्हाणला पु्ण्यात आणलं; आज न्यायालयात करणार हजर
महानगरपालिकेने या भागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन दिवसांच्या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्यामुळे घरगुती पाणी वापरात काटकसर करणे आवश्यक आहे. या कामामुळे भविष्यातील पाणी वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.