मुंबई : आज जागतिक महिला दिन प्रत्येक क्षेत्रात आपला भरभक्कम ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. आंतरराळ असो समाजकारण असो की राजकारण कोणतंही क्षेत्र तिच्या कर्तृत्वाची झेप कमी करु शकलं नाही. राजकारणातलं असंच एक गाजणारं नाव म्हणजे महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांचं आहे. महिला दिनानिमित्त जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी त्यांच्याशी केलेल्या या खास बातचित केली आहे.
जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांनी महिला दिनानिमित्त आदिती तटकरे यांना महाराष्ट्रात गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमागची मूळ संकल्पना काय याविषयी विचारले. त्यावर बोलताना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना आणताना आम्हाला वयोगटाचा विचार करावा लागला. वयवर्ष 21 च्या खाली असणाऱ्या मुली किंवा तरूणींसाठी योजना आहेत. तसेच 65 वर्षांवरील महिलांसाठीही योजना आहेत. मात्र 21 ते 65 वर्षातील महिलांसाठी काही योजना असल्याचे आढळले नाही. त्यामुळे आम्ही 21 ते 65 या वयोगटातील निराधार, आर्थिक दुर्बल आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि ती यशस्वीरित्या चालू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
हेही वाचा : महिलादिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांच्याकडे सोपवली सोशल मीडिया अकाउंट हाताळण्याची जबाबदारी; कोण आहेत या महिला? जाणून घ्या
लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा पाहायला मिळाली. याविषयी बोलताना या योजनेच्या बाबतीत बऱ्याच नकारात्मक चर्चा केल्या गेल्या. पण आम्ही सकारात्मक दृष्ट्या लाडकी बहीण योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून आम्ही अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचलो. लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळाला. त्याचबरोबर योजनेवर टीकादेखील झाली परंतु त्या महिलांना होणार आनंद आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजने योजना यशस्वीपणे राबवणे आणि अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचे धैर्य असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
महिला सुरक्षा, योग्य दीशा
महिलांच्या सुरक्षिततेवर बोलताना महिलासांठी असणाऱ्या कायद्याविषयी त्यांनी सांगितले. शक्ती कायद्यात सुधारणा होणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेणार आहे. मुख्यमंत्र्यांचं योजनेकडे विशेष लक्ष असल्याचे मंत्री तटकरे यांनी म्हटले.
पिंक रिक्षा, प्रगतीचा प्रवास
महिला चालकांसाठी खास योजना आणली आहे. ती म्हणजे पिंक रिक्षा योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्किंग वुमन विभागात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटनाच्या ठिकाणीही 'पिंक रिक्षा' उभ्या करणार आहे. दहा हजार रिक्षा सेवेत आणण्याचं उद्दिष्ट असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा : Insider Trading नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल SEBI चा Nestle ला इशारा; काय आहे प्रकरण? वाचा
लेक लाडकी, आमची जबाबदारी
मुलींसाठी लेक लाडकी योजना आणली आहे. मुलीच्या जन्मापासून 18 वयाची होईपर्यंतची योजना आहे. वयाच्या मुख्य टप्प्यावर पैसे खात्यात जमा होतात. मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी लेक लाडकी योजना महत्त्वाची आहे. शैक्षणिक जागरुकता वाढवण्याचंही उद्दिष्ट आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी योजना आणली आहे. ती 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी वरदान आहे असे मंत्री तटकरे यांमी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
सन्मान विधवा महिलांचा
विधवा महिलांसाठी सरकार बऱ्याच योजना आणल्या आहेत. एकल महिलांना आर्थिक सहाय्यता करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना आणली आहे. पती निधनानंतर आर्थिक आधार देणारी योजना आहे. कोरोना काळात संकट आलेल्यांसाठी ठोस पाऊल सरकारने उचलली आहेत असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
स्त्रियांच्या प्रगतीची ठोस पाऊलं
स्त्रियांच्या प्रगतीसाठी सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, पिंक रिक्षा योजना, लोक लाडकी योजना, संजय गांधी निराधार योजना, दामिनी पथक योजना, हिरकणी कक्ष योजना आणल्या आहेत असे जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री तटकरेंनी म्हटले आहे.
लाडकी बहीण, आनंदी बहीण
महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. 21 ते 65 वर्ष वयातील स्त्रियांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. उत्पन्न कमी असणाऱ्या कुटुंबासाठी आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेमध्ये लाभार्थी संख्या मोठी आहे. योजनेवर जास्त प्रमाणात टीका झाली पण महिलांचा आनंद महत्वाचा आहे. बोगस नोंदणी झाली त्यावर कारवाई होणारच आहे. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणण्यात यश मिळाले. आर्थिक जागरुकता आणणं महत्वाचं असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
महिला सुरक्षा, काळाची गरज
महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल सरकाने उचलले आहे. त्यासाठी पोलीस स्टेशमध्ये दामिनी पथकाची व्यवस्था करण्यात आली. तसेच हिरकणी कक्ष महिलांसाठी केले गेले. यांसारख्या महिलांसाठी उपयुक्त योजना आणल्या असल्याचे मंत्री तटकरेंनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना महिलांच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक महिलेला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.