नाशिक : नाशिकमधील पोलिस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका तृतीयपंथाने नाशिक पोलीस ठाण्यात कपडे काढले आहेत. पोलिस तक्रार करून घेत नसल्याने तृतीयपंथाने हे कृत्य केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नाशिकमधील पोलिस स्टेशनमध्ये तृतीयपंथाने गोंधळ घातला आहे. तृतीयपंथीयाच्या गाडीची जाळपोळ केल्याने त्याची दाद मागण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला. यावेळी पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने तृतीयपंथीयाला राग आला. या रागातून तृतीयपंथीयाने पोलिस ठाण्यात कपडे काढण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.
हेही वाचा : अर्थसंकल्प सादर करताना काय म्हणाला निर्मला सितारमण?
नेमंक प्रकरण काय?
नाशिकमध्ये एका तृतीयपंथीची गाडी अज्ञात व्यक्तीने जाळली. या घटनेची तक्रार करण्यासाठी तृतीयपंथी पोलिस स्टेशमध्ये गेला. पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिस त्याची तक्रार घेत नव्हते. पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने तृतीयपंथीयाने तिथे गोंधळ घातला. त्याने नाशिक पोलीस ठाण्यात कपडे काढले. या प्रकारमुळे सगळ्यांना धक्का बसला. तृतीयपंथीयाने घातलेला गोंधळ पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या प्रसंगानंतर तृतीयपंथीयाची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली.
हेही वाचा : "भिवंडीतील युवकाची आत्महत्या; जास्त व्याजाचा तगादा"
पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तृतीयपंथीयाची तक्रार दाखल करून घेतली. नाशिकच्या म्हसरूळ आरटीओ परिसरात जाळपोळ करण्यात आली होती. या सगळ्या गोंधळानंतर पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयतांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील अधिकचा तपास सुरू आहे.