उद्योगपती गौतम अदानी यांची मध्यरात्रीची भेट राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर अदानी यांनी अचानक भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. 15 मार्चच्या रात्री उशिरा झालेल्या या भेटीमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप या भेटीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
उद्योगपती धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेमध्ये अदानी समूहाने मोठी मजल मारली आहे प्रकल्पांतर्गत धारावीतील झोपडपट्यांचे सर्वेक्षण आणि रहिवाशांची पात्रता निश्चित केली जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीतून ‘धारावी रिडेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड' (DRPPL) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अदानी समूहाचा 80 टक्के आणि राज्य सरकारचा 20 टक्के हिस्सा आहे.
धारावी पुनर्विकासानंतर आता अदानी समूहाने मुंबईतील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी मिळवली आहे. गोरेगाव पश्चिमेतील 143 एकरच्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने तब्बल 36,000 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. मुंबईतील हा सर्वांत मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी एक मानला जातो.
हेही वाचा: मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदलापूर-कर्जत रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी पंतप्रधानांचे मानले आभार
फडणवीस-अदानी भेटीमागचे गूढ काय?
या भेटीनंतर धारावी आणि मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून आतापर्यंत 25 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अदानी समूहाच्या वाढत्या प्रभावामुळे ही भेट भविष्यातील मोठ्या औद्योगिक निर्णयांशी संबंधित असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात या भेटीमागचे नेमके कारण काय, याची उत्सुकता आता अधिकच वाढत आहे.