नाशिक : नाशिकमधील गोदावरी आणि नंदिनी नदीचे पाणी दूषित असल्याचं निष्पन्न झाले. गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्याकडून खासगी लॅबमध्ये पाणी तपासणी करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंह यांनी खासगी लॅबमध्ये नंदिनी आणि गोदावरी नदीतील पाण्याचे नमुने तपासले. गोदावरी नदीतील एका ठिकाणाचे तर नंदिनी नदीतील तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले. तपासणीत दोन्ही नद्यांचे पाणी प्रदूषित असल्याचे निष्पन्न झाले. तर गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत उघड झाले होते.
हेही वाचा : महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे दागिने चोरी प्रकरणातील सहा आरोपी जेरबंद
खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत पाण्याचे बोड (bod) लेवल एमपीसीबीने (mpcb) केलेल्या तपासणीपेक्षा जास्त आहे. खासगी लॅबमध्ये तपासलेल्या पाण्याचे बोड (bod) लेवल 30 पेक्षा जास्त तर एमपीसीबीने (mpcb) तपासलेल्या पाण्याचे बोड (bod) लेवल 5 च्या आसपास होते. तसेच नंदिनी नदीत केमिकल मिश्रित पाणी असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. गोदावरीच्या उपनद्या प्रदूषित असल्यामुळे गोदावरी नदी शुद्ध कशी अशा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते जगबीर सिंह यांनी उपस्थित केला आहे.