छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हवाई सफर करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. राज्यात विमानाने प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर चौथ्या स्थानी आहेत. ऑक्टोबरमधील एका खासगी कंपनीच्या अहवालाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यात सर्वाधिक विमान प्रवासी मुंबई विमानतळाचे आहेत. त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या स्थानी आहे. कार्गो वाहतुकीतही मुंबईच 'नंबर वन' आहे. राज्यातील 13 विमानतळांमध्ये शिर्डी विमानतळ पाचव्या स्थानी आहे.
सर्वात जास्त विमान प्रवास कोणत्या शहरात ?
- मुंबई
- पुणे
- नागपूर
- छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्रातील सर्वाधिक विमान प्रवाशांचे शहर
महाराष्ट्रात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळ हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे विमानतळ आहे. जिथून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. 52 कोटी 8 लाख 20 हजार प्रवाशांनी मुंबईतून विमान प्रवास केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विमानतळ आहेत. पुण्यातून 9 कोटी 52 लाख 5 हजार 484 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तिसरा क्रमांक नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 2 कोटी 79 लाख 4 हजार 427 प्रवाशांनी नागपूरमधून प्रवास केला आहे.छत्रपती संभाजीनगरात 6 लाख 23 हजार 915 इतक्या लोकांनी 2023-24 या वर्षी विमान प्रवास केला आहे.