Sunday, August 17, 2025 03:55:55 PM

होळीचा रंग मटणच्या स्वादात! ठाण्यात खवय्यांच्या रांगा

ठाण्यातील मटणप्रेमींची मटण शॉप्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धुळवडीच्या दिवशी मटण आणि मांसाहारी पदार्थांचा आनंद घेण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.

होळीचा रंग मटणच्या स्वादात ठाण्यात खवय्यांच्या रांगा

ठाणे: होळी म्हणजे रंगांचा उत्सव, पण काहींसाठी हा स्वादाचा देखील सण असतो. याच उत्साहात ठाण्यातील मटणप्रेमींची मटण शॉप्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धुळवडीच्या दिवशी मटण आणि मांसाहारी पदार्थांचा आनंद घेण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.

शुक्रवार आणि होळीचा सण एकत्र आल्याने ठाण्यातील मटण दुकानांबाहेर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः कलीना, सांताक्रूझ पूर्व, अंधेरी आणि ठाणे परिसरात मटण खरेदीसाठी मोठी चढाओढ दिसून येत आहे.

हेही वाचा: होळीच्या दिवशीच खोक्याचं घर पेटवलं, बीडमध्ये खळबळ

गेल्या काही वर्षांत धुळवडीला मटण खाण्याची प्रथा लोकप्रिय झाली असून, यामुळे मटणविक्रीत वाढ झाली आहे. दुकानदारांनाही याचा चांगलाच फायदा होत आहे. होळीचा उत्साह आणि मटणाचा स्वाद यामुळे खवय्यांसाठी आजचा दिवस अधिक विशेष ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री