बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात सकल हिंदू समाजाकडून एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि हिंदू समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.

मोर्चाचे मुख्य उद्दीष्ट बांगलादेशातील हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करणे आणि भारत सरकारकडे बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याची मागणी करणे हे होते. या मोर्च्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला.

या मोर्चात मलकापूर शहरातील तहसीलदारांना एक निवेदनही दिले गेले. या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आणि त्यासाठी भारत सरकारने युनेस्कोच्या माध्यमातून बांगलादेश सरकारवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाने मलकापूर शहरात एकजुटीचा संदेश दिला आणि बांगलादेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या मोर्चाद्वारे भारतीय सरकारला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.