मुंबई : प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाकडून कोरटकरला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरटकरचा गुढी पाडवा जेलमध्येच होणार आहे. कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना मोबाईलद्वारे धमकी दिली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांना 24 मार्च रोजी तेलंगणातून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावर कोल्हापूर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज प्रशांत कोरटकरबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. प्रशांत कोरटकरवर वकिलांनी हल्ला केल्याचं बोललं जातं आहे. वकिलांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतलं असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याआधी कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि हा प्रकार समोर आला.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्प वादात
कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने कोरटकर याच्यावर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला अटक केली. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आज त्याला परत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.