महाराष्ट्र: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी समोर येतेय. सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री बसणार असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कामगार वर्ग सार्वजनिक वाहतुकीने म्हणजेच बस आणि रिक्षाने प्रवास करत असतात. परंतु आता भाडेवाढ होणार असल्याने सर्वसान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रिक्षा, टॅक्सीच्या देखभालीचा खर्च वाढला आहे, महागाई वाढली आहे, पेट्रोल डिजेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'हे' असू शकतात कारणे:
इंधन दरवाढ: पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्याने वाहन मालकांना प्रवासाचे भाडे वाढवण्याची आवश्यकता भासते.
ऑपरेशनल खर्च वाढी: वाहनांच्या देखभालीचा खर्च, चालवण्याचा खर्च, ड्रायव्हर्सच्या वेतनामध्ये वाढ यामुळे प्रवासाच्या भाड्यात वाढ होऊ शकते.
महागाई: देशातील सर्वसाधारण महागाईच्या दरात वाढ झाल्यास, प्रवासाशी संबंधित सर्व वस्तू आणि सेवांचा खर्चही वाढतो, ज्यामुळे भाड्यात वाढ होऊ शकते.
मागणी आणि पुरवठा: काही ठिकाणी प्रवासासाठीची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असतो, ज्यामुळे प्रवासाच्या भाड्यात वाढ होऊ शकते.