Sunday, April 20, 2025 04:56:55 AM

आदित्यच्या समर्थनात उतरला सत्ताधाऱ्यांचा आमदार

राज्यात पाच वर्षानंतर दिशा सालियन प्रकरण चर्चेत आले आहे.

आदित्यच्या समर्थनात उतरला सत्ताधाऱ्यांचा आमदार

मुंबई : राज्यात पाच वर्षानंतर दिशा सालियन प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणात आता दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचे त्यांनी याचिकेद्वारे म्हटले आहे. यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर प्रतिक्रिया करताना दिसत आहेत. त्यातच आता दिशा सालियन हा राज्यासमोरचा महत्वाचा मुद्दा नाही असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. दिवंगत दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात दिशाचा मृत्यू नसून हत्या केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी आदित्यच्या समर्थनात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दिशा सालियन हा राज्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा नाही अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. दिशा प्रकरणात याचिका दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांची चुप्पी का? तसेच आदित्य ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणीही राणे यांनी केली. दरम्यान मिटकरी यांनी राणेंच्या विरोधात वक्तव्य केले आहे. 


काय म्हणाले मिटकरी? 

2020 आली घटना घडली आता 2025 मध्ये तिच्या वडिलाचे याचिका दाखल केली. इतक्या वर्षांनी याचिका का दाखल केली हा प्रश्न आहे. कालपर्यंत औरंगजेबचा विषय होता आणि आता दिशा सालियन प्रकरण पुढे आले आहे. पण महाराष्ट्रासमोर हा प्रश्न नाही. दिशा सालियनच्या वडीलांना न्याय मिळो पण या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न भरकटू नये.

दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटलं? 
दिशाचा मृत्यू हा अपघाती झाला असं भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगत असेलली गोष्ट खरी असल्याची भासवत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राबाहेर सुनावणी घ्या. 8 जून 2020ला दिशाच्या घरी झालेली पार्टी होती. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्यावरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. बलात्काराचा उल्लेख शवविच्छेदन अहवालातून गायब आहे. दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, आत्महत्या करणंच शक्य नाही. दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवण्यात आलं. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून राजकीय दबाव आणला गेला. सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल बनावट तयार केले गेले. दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकून 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दाखवलं. दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशिर केला. निष्पक्ष कारवाई होण्यासाठी तपास अधिकारी म्हणून समीर वानखेडेंची नेमणूक करावी असं सतिश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री