नांदेड: सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. नांदेडमधील दोन महत्वाच्या लोकांनी ठाकरे गटाची साथ सोडलीय. यामुळे आता कोकणापाठोपाठ नांदेडमध्ये देखील ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याच पाहायला मिळतंय.नांदेडमधील ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा: बनवा विविध प्रकारच्या 'ह्या' घरगुती चटण्या
दरम्यान अवघ्या दोन तीन दिवसांपूर्वीच ठाकरे गटात असलेले माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्यातच आता त्यातच ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नांदेडमधील ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी आणखीनच वाढलीय. दत्ता पाटील कोकाटे आणि एकनाथ पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोकाटे आणि एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे.
हेही वाचा: अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना जोरदार तयारी करतांना पाहायला मिळतेय. याच पार्शवभूमीवर शिवसेनेने ऑप्रेशन टायगर देखील राबवत आहे. त्यानंतर आता शिवसेनेपाठोपाठ ठाकरे गटाचे नेते भाजपात देखील प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळालंय.