नवी दिल्ली : सोने हा केवळ एक मौल्यवान धातू नाही तर, हा कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती देखील दर्शवतो. जगातील वेगवेगळ्या देशांकडे असलेल्या सोन्याचे प्रमाण मोजले जाते आणि त्यांच्या साठ्यात त्याचा समावेश होत असतो. भारत आणि पाकिस्तानच्या सोन्याच्या साठ्यात खूप फरक आहे. कोणत्या देशांमध्ये किती सोने आहे आणि या बाबतीत भारत आणि पाकिस्तान कुठे आहेत ते जाणून घेऊया.
सोन्याच्या साठ्याबद्दल बोलायचे तर अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेकडे तब्बल 8,133 टन सोने आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात श्रीमंत सोन्याचा साठा असलेला देश बनला आहे. यानंतर, जर्मनीचा नंबर लागतो. 3,352 टन सोन्यासह जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इथेच एक बाब लक्षात येते की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशांमध्ये सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत केवढी तफावत आहे. बाकी सर्व यापेक्षा खालील क्रमांकावर आहेत. रशिया आणि चीनदेखील अमेरिकेपेक्षा खूपच दूर आहेत. सध्या महासत्ता म्हणवला जाणारा चीन तर पहिल्या पाचातही नाही.
हेही वाचा - भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर चिनी कंपन्यांना मोठे नुकसान; अब्जावधींचे शेअर्स कोसळले
जर्मनीशिवाय आणखी प्रमुख युरोपीय देशांकडील सोन्याचे साठे
युरोपीय देशांबद्दल बोलायचे झाले तर, इटलीकडे 2,452 टन सोने आहे आणि फ्रान्सकडे 2,437 टन सोने आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीतही हे दोन्ही देश खूप मजबूत स्थितीत आहेत. पण पहिल्या क्रमांकाच्या तुलनेत विचार केला तर हा खूपच मोठा फरक आहे.
रशिया आणि चीनही मागे नाहीत
रशियाकडे 2,340 टन सोने आहे, ज्यामुळे तो जगातील सोन्याचा साठा असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये येतो. त्याच वेळी, चीनकडे 1,948 टन सोने आहे, जे त्याला या यादीत महत्त्वाचे स्थान देते.
भारताचा सोन्याचा साठा किती आहे?
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारतही जगात चांगल्या स्थितीत आहे. भारताकडे 878 टन सोने आहे. ज्यामुळे सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत तो जगातील पहिल्या 10 देशांमध्ये येतो.
पाकिस्तानकडे किती सोने आहे?
आता आपण पाकिस्तानमधील परिस्थितीकडे येऊया. पाकिस्तानकडे फक्त 64 टन सोने आहे. भारताच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. भारताचा सोन्याचा साठा पाकिस्तानपेक्षा सुमारे 14 पट जास्त आहे. यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तान या बाबतीत भारतापेक्षा खूप मागे आहे.
जपान आणि नेदरलँड्सची स्थिती
जगात अगदी चिमुकले क्षेत्रफळ असलेल्या जपानकडे 846 टन आणि नेदरलँड्सकडे 612 टन सोने आहे. हे दोन्ही देश सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताच्या आसपास आहेत. पण पाकिस्तान त्यांच्या खूप मागे आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये इतका मोठा फरक का?
भारत आणि पाकिस्तानच्या सोन्याच्या साठ्यात एवढ्या मोठ्या फरकामागे अनेक कारणे आहेत. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा खूपच मजबूत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी सोन्याचा साठा वाढवते, ज्यामुळे भारताची आर्थिक स्थिती मजबूत होते.पाकिस्तानला तुटपुंज्या आर्थिक स्थितीतून वर येण्यासाठी त्यांच्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम; जर्मनीपासून युके आणि दक्षिण कोरियापर्यंत हाहाकार