मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या प्रकोपामुळे मुंबईकर हैराण झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नुकताच, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित देशांसह आणि राज्यासह महाराष्ट्रातील इतर शहरात ऑरेंज, रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मुंबईमध्ये देखील पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हेही वाचा: नागपूर पोलिसांची 'ऑपरेशन थंडर' मोहीम जोरात; अमली पदार्थ तस्करी विरोधात पोलीस अलर्ट
आठवडाभर होणार मुसळधार पाऊस - हवामान खाते:
मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या विजांच्या कडकडांसह जोरदार पावसामुळे मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड या उपनगऱ्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास जोगेश्वरी येथे सर्वाधिक 63 मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही मुसळधार पाऊस झाला होता.
हेही वाचा: आजारपणाचं कारण सांगून विदेशवारी केल्यामुळे अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी - नितेश राणे
हवामान खात्याचा इशारा:
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे (50-60 किमी/तास) आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर पुढील आठवडाभर पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईकरांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे साकीनाका ते अंधेरी स्थानक दरम्यान अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच, अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर, सोशल मीडियावर चांदिवली नागरिक कल्याण संघाने वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, उपनगरातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला होता. पवईमध्ये झाड कोसळण्याच्या घटनेत 40 वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली. सोबतच, ठाणे, रायगड, पालघर येथे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईकरांना सावध राहण्यास सांगितले आहे तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे वाहन देण्यात आले आहे.