मुंबई : पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. हवामानशास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की आठवड्याच्या शेवटी पाऊस पडण्याची शक्यता असली तरी, वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाचा (IMD) भाग असलेल्या मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, शहरात आठवड्याच्या शेवटी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी वादळे येण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगडसारख्या जवळच्या जिल्ह्यांना वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाच्या अंदाजामुळे 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. वातावरणातील बदल शुक्रवारपर्यंत लागू आहेत.
हेही वाचा : पवारांमुळे मोदींची अटक टळली; नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे खळबळजनक दावे
पश्चिम किनाऱ्यावर भरपूर आर्द्रता असल्याने मुंबईत आर्द्रता वाढत आहे असे हवामान प्रेमी ऋषिकेश आगरे म्हणाले. ज्यांना एक्स वर 'मुंबई रेन' म्हणून ओळखले जाते. शहरात सतत पाऊस नसताना ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे, ज्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. पुढील तीन ते चार दिवस हाच प्रकार सुरू राहणार आहे आणि 21 मे पासून मुंबई आणि एमएमआरमध्ये दररोज वादळासह पाऊस पडेल असे आगरे म्हणाले.
दरम्यान, 'व्हॅगरीज ऑफ द वेदर' या खाजगी हवामान ब्लॉगचे हवामानशास्त्रज्ञ राजेश कपाडिया यांनीही परिस्थितीत झालेल्या बदलाची नोंद केली. मुंबईत दररोज 10 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणार नाही अशा तुरळक वादळांची अपेक्षा असू शकते. पुण्यात पुढील काही दिवसांत दुपारी वादळाची शक्यता आहे, दिवसाचे तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस आणि दररोज 10 ते 20 मिमी दरम्यान पाऊस पडेल असे कपाडिया म्हणाले. पुढे बोलताना महाराष्ट्रात उन्हाळ्यात तीव्र उष्णता अपेक्षित नाही. मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये वादळे येऊ शकतात. पुढील 10 दिवसांत कोणत्याही मोठ्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही असे कपाडिया यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.
यलो अलर्ट म्हणजे नेमके काय?
यलो अलर्ट मध्यम ते तीव्र पावसाची स्थिती दर्शवितो. जो हवामान परिस्थितीमुळे संभाव्य व्यत्यय येण्याची चिन्हे दर्शवतो. यलो अलर्ट असलेल्या भागात एका तासाच्या कालावधीत 7.5 मिमी ते 15 मिमी दरम्यान पाऊस पडेल.