Sunday, August 17, 2025 04:54:44 AM

पंतनगर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

पंतनगर मोबाइल मिसिंग पथकाचे स्तुत्य कार्य, हरवलेला मोबाइल काही तासात सापडला

पंतनगर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य 

प्राची ढोले : घाटकोपर पंतनगर पोलिस हद्दीतील एक युवतीचा आयफोन १२ मोबाइल काही तासांच्या आत सापडून त्या युवतीला परत करण्यात आला. पंतनगर पोलिसांच्या मोबाइल मिसिंग पथकाने केलेल्या कार्याची सर्वत्र स्तुती केली जात आहे.

२ डिसेंबर रोजी पंतनगर पोलिस हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने आपला आयफोन १२ हरवला असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली होती. तिच्या तक्रारीनुसार, तिचा मोबाइल बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी या प्रकरणाचा तपास मोबाइल हरवलेल्या पथकाचे हेड कॉन्स्टेबल संतोष गीध यांना सोपवला.

संतोष गीध यांनी तपास सुरू करत पीडित युवतीचा मोबाइल ट्रेस केला. ३ डिसेंबर रोजी ते मोबाइल जप्त करण्यात सफल झाले. त्यानंतर, महिला पोलीस उपनिरीक्षक मैना चट आणि दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या उपस्थितीत पीडित युवतीला तिचा आयफोन १२ परत करण्यात आला.

पीडित युवतीने मोबाइल परत मिळाल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पंतनगर पोलिसांच्या या कार्यामुळे परिसरात चांगली चर्चा झाली असून, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या विश्वासाला चालना मिळते आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल पोलीस विभागाकडून उचलण्यात आल्याने पोलिसांवरचा विश्वास नागरिकांमध्ये अधिक दृढ झाला आहे.


सम्बन्धित सामग्री