Sunday, August 17, 2025 03:50:21 PM

उल्हासनगरकरांच्या आरोग्याशी खेळ? चक्क गटाराच्या पाण्यात धुतल्या जातात भाज्या

शहराच्या खेमाणी मार्केट परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही भाजी विक्रेते चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 उल्हासनगरकरांच्या आरोग्याशी खेळ चक्क गटाराच्या पाण्यात धुतल्या जातात भाज्या

उल्हासनगर: शहराच्या खेमाणी मार्केट परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही भाजी विक्रेते चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

खेमाणी मार्केटमधील पोस्ट ऑफिससमोर एक उघडं गटार आहे, आणि याच गटारातील घाण पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत. इतकंच नव्हे, तर गटारातील पाणी बादलीने काढून भाज्यांवर टाकले जात असल्याचेही दिसून आले आहे. या प्रकारामुळे आरोग्यासाठी हितकारक मानल्या जाणाऱ्या पालेभाज्याच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत.

डॉक्टर नेहमीच ताज्या व स्वच्छ भाज्या खाण्याचा सल्ला देतात, मात्र या प्रकारामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गटारातील पाण्यात असलेल्या जंतूंमुळे विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने त्वरित कारवाई करून अशा भाजी विक्रेत्यांना धडा शिकवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :Mumbai: वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम

शहरातील आरोग्य विभाग यावर काय भूमिका घेणार आणि याला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री