Thursday, May 22, 2025 06:52:01 PM

बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे; नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसमधला प्रकार

नवी मुंबईत परिवहन विभागाच्या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहेत. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसमधला प्रकार

नवी मुंबई : नवी मुंबईत परिवहन विभागाच्या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहेत. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. 

नवी मुंबईत परिवहनच्या बसमध्ये तरुण तरुणीचे अश्लील कृत्य समोर आले आहे आणि याचा व्हिडीओ व्हायरल झालाआहे.या व्हिडिओवरुन महानगरपालिकेने कंडक्टरविरुद्ध विभागीय कारवाई सुरू केली आहे. कंडक्टरने जोडप्याला का थांबवले नाही याचे लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : 'नव्या वक्फ कायद्याबाबत मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा'

नेमकं प्रकरण काय?
पनवेलहून कल्याणला परिवहन विभागाची बस जात होती. यावेळी बसमध्ये तरुण-तरुणी अश्लील जाळे करताना दिसली. एसी बस असल्याने काचा बऱ्याच मोठ्या होत्या. त्यामुळे तरुण-तरुणीचे अश्लील चाळे बाहेर असलेल्या लोकांनाही दिसत होते. यावेळी एका मोटारचालकाने 22 सेकंदांचा व्हिडिओ शूट केला होता. ज्याने या तरुण तरुणीला बसच्या खिडकीतून पाहिले होते. पनवेलहून कल्याणला जात असताना बस बरीच रिकामी होती. वाहतूक कोंडीमुळे बसचा वेग कमी झाला तेव्हा एकाने त्या जोडप्याचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. 

 


सम्बन्धित सामग्री