Sunday, June 15, 2025 12:30:17 PM

82 वर्षीय सदानंद करंदीकरांनी दिली पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी

डोंबिवलीतून लोकलने आणि पुढे बसचा प्रवास करून 82 वर्षीय सदानंद करंदीकर मंत्रालयात आले. तसेच, सदानंद करंदीकर यांनी पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली.

82 वर्षीय सदानंद करंदीकरांनी दिली पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी

मुंबई: डोंबिवलीतून लोकलने आणि पुढे बसचा प्रवास करून 82 वर्षीय सदानंद करंदीकर मंत्रालयात आले. त्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. तसेच, सदानंद करंदीकर यांनी पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली आहे. या दानशूर पुत्राचे नाव आहे सिंधुपुत्र सदानंद विष्णू करंदीकर. सदानंद करंदीकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील आहे. 

समाजासाठी आयुष्यभराची कमाई समर्पित:

आपल्या आयुष्याची कमाई समाजासाठी समर्पित करताना, सदानंद करंदीकरांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदानंद करंदीकर यांच्या दातृत्वाला दाद दिली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच, करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला त्यांनी नमन केले. 

हेही वाचा: राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे; वैष्णवी हगवणे यांच्या आईची मागणी

सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती. सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. मात्र, दोघांना अपत्य नसल्यामुळे दोघे नेरुळ येथील आनंद वृद्धाश्रमात राहतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सदानंद करंदीकर यांच्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते.  सदानंद करंदीकर यांनी कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांचे संघर्ष आणि आर्थिक संघर्ष प्रत्यक्ष पाहिले. म्हणून, त्यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांच्या कमाईचा मोठा भाग समाजाला परत देण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच अध्यात्म आणि शेतीमध्ये रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयात धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीला १० लाख रुपये आणि पंतप्रधान मदत निधीला 10 लाख रुपये अशा एकूण २० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

हेही वाचा: 'काय नुसता बावळटांचा बाजार लावलाय'; अजित पवार संतापले

सदानंद करंदीकर हे 82 वर्षांचे आहेत. ते सध्या त्यांची बहीण प्रभा श्रीराम शितुत यांच्यासोबत राहतात. सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री. सदानंद करंदीकर, ज्यांना वृद्धाश्रम आणि कर्करोग रुग्णांच्या कुटुंबांना चालविण्याचा व्यापक अनुभव आहे, त्यांनी सागराप्रमाणे समाजाचे ऋण कमी करण्यासाठी मदत करण्यात त्यांची औदार्य अमर्याद आहे हे सिद्ध केले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. समाजाचे ऋण कमी करण्यासाठी मदत करण्यात त्यांची उदारता अमर्याद आहे हे सागराप्रमाणेच सदानंद करंदीकर यांनी सिद्ध केले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

'82 वर्षांचे श्री सदानंद विष्णु करंदीकरजी आपल्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर यांच्यासह सेवा निवृत्त झाल्यानंतर अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहायला गेले. मात्र, मागील वर्षी श्रीमती सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. यादरम्यान कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी होणारी धडपड श्री करंदीकर जी यांनी जवळून पाहिली. त्यामुळे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 10 लाख, अशा एकूण 20 लाखांच्या देणगीचा धनादेश दिला. एकीकडे दुःखातून वेदना आणि नैराश्याची भावना निर्माण होणारी असंख्य उदाहरणे असताना दुःखातून करुणेच्या निर्मितीचे हे मूर्तीमंत उदाहरण. सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व असलेले श्री सदानंद विष्णु करंदीकरजी यांचे हे मानवतेचा शिखरबिंदू ठरणारे कार्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी राहील', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत सदानंद करंदीकर यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. 
 


सम्बन्धित सामग्री