मुंबई: मंत्रालयात आपल्याला अनेक बड्या मंत्र्यांचा व्हीआयपी ताफा पाहायला मिळतो. मात्र, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा विशेषत: अजित पवारांचा ताफा वेळेत हजर न झाल्यामुळे त्यांनी सर्वांना धारेवर धरले आणि म्हणाले की, 'काय बावळटांचा बाजार लावलाय, कुठे आहेत सगळे? मी खाली आलोय हेदेखील माहीत नाही का?'. अजित दादांचा रूद्रावतार पाहताच सुरक्षा रक्षकांची मात्र मंत्रालयाच्या आवारात धावपळ सुरू झाली.
नेमकं प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मनात जे काही आहे, ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येते. त्यामुळे जर त्यांना राग आला आणि त्यांनी तो व्यक्त नाही केलं तर नवलच. बुधवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातील बैठका संपवून देवगिरी बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, जेव्हा अजित पवार मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले होते, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची कार तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा तयार नव्हता. त्यामुळे, अजित पवारांनी कारच्या येण्याची प्रतीक्षा देखील केली. मात्र, तरीदेखील कार काही केल्या आली नाही. अशातच, मंत्रालयातील काही हवशी मंडळींंनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करू लागले. यामुळे, अजित पवार चांगलेच संतापले आणि सर्वांसमोर त्यांनी सुरक्षारक्षकांना धारेवर धरत म्हणाले की, 'काय बावळटांचा बाजार लावलाय, कुठे आहेत सगळे? मी खाली आलोय हेदेखील माहीत नाही का?'. अजित दादांचा रूद्रावतार पाहताच सुरक्षा रक्षकांची मात्र मंत्रालयाच्या आवारात धावपळ सुरू झाली. गेल्या 10 मिनिटांपासून हा सर्व प्रकार मंत्रालयात सुरु होता. शेवटी, कंटाळून उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या कारमध्ये बसले आणि देवगिरी बंगल्यावर रवाना झाले.