मुंबई: गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी वगदान ठरत असून, जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये फक्त मुंबई आणि उपनगरांमधील एकूण 525 रुग्णांना 4 कोटी 95 लाख रुपये इतकी आर्थिक मदत या निधीतून प्रदान करण्यात आली आहे. तसेच, या काळात मुंबई शहरातील 328 आणि उपनगरांमधील 198 रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये, कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी सर्वाधिक रुग्णांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेतला असून, यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला लढा देणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना एक प्रकारचे वरदान ठरणार आहे, अशी भावना रुगण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा: देशद्रोहाचा आरोप लागताच युट्युबर ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाऊंट निलंबित
सर्वाधिक मदत मिळालेल्या आजारांचे तपशील :
1 - कॅन्सर = 95
2 - मेंदूच्या आजारांवरील उपचार = 46
3 - कॅन्सरवरील किमोथेरपी / रेडिएशन = 39
4 - हिप रिप्लेसमेंट = 30
5 - हृदयविकारावरील उपचार = 29
हेही वाचा: कारचे टायर फुटल्यामुळे मोठा अपघात; दोघे जण जागीच ठार तर चौघेजण गंभीर जखमी
मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये :
मुंबई शहर:
1 - सैफी हॉस्पिटल = 9 रुग्ण
2 - बॉम्बे हॉस्पिटल अँड खुबचंदानी कॅन्सर सेंटर = 8
3 - हिंदुजा हॉस्पिटल = 8
4 - रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल = 7
5 - जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर = 7
मुंबई उपनगर:
1 - साई मेडिकेअर अँड साई हॉस्पिटल, चेंबूर = 30
2 - आरएमएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कांदिवली = 29
3 - स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजी, घाटकोपर = 26
4 - होली स्पिरिट हॉस्पिटल, अंधेरी = 20
5 - बेंझ मल्टीस्पेशालिटी, सांताक्रूझ = 16
सामान्य नागरिकांच्या वैद्यकीय गरजांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या योजनेबद्दल राज्यभरात समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच, निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग वाढवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
मदतीचा वाढता आलेख :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मदतकार्याचा आलेख सातत्याने वाढत आहे. खालीलप्रमाणे महिन्यावार मदतीचे आकडे स्पष्टपणे दर्शवितात की, गरजू रुग्णांसाठी ही योजना किती परिणामकारक ठरते आहे.
1 - डिसेंबर 2024: 1392 रुग्ण - 12 कोटी 21 लाख रुपये
2 - जानेवारी 2025: 1788 रुग्ण - 15 कोटी 81 लाख 27 हजार रुपये
3 - फेब्रुवारी 2025: 2070 रुग्ण - 18 कोटी 34 लाख रुपये
4 - मार्च 2025: 2521 रुग्ण - 22 कोटी 22 लाख 49 हजार रुपये
5 - एप्रिल 2025: 2430 रुग्ण - 21 कोटी 32 लाख रुपये.