पुणे : पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांनी जोर लावला होता. मात्र भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला असून या जागेवर हर्षदा जाधव यांचा तब्बल 9,700 मतांनी विजय झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव पराभूत झाल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मीता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. या निवडणुकीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 13 हजार 95 मतं मिळाली. या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासोबतच पुणे शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक झाली होती. हे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ला मानले जातात. या दोन्ही जागांवर आमचाच विजय होईल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.