पहिल्याच प्रयत्नात मोठं यश! भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत मविआच्या हर्षदा जाधवची विजयाला गवसणी

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मीता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेतली.

पहिल्याच प्रयत्नात मोठं यश! भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत मविआच्या हर्षदा जाधवची विजयाला गवसणी
Harshada Jadhav

पुणे : पदवीधर मतदाररसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांनी जोर लावला होता. मात्र भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव यांचा धक्कादायक पराभव झाला असून या जागेवर हर्षदा जाधव यांचा तब्बल 9,700 मतांनी विजय झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव पराभूत झाल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासनूच स्मीता जाधव आणि हर्षदा जाधव यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. परंतु नंतरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांनी आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. या निवडणुकीत हर्षदा जाधव यांना 1 लाख 13 हजार 95 मतं मिळाली. या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासोबतच पुणे शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक झाली होती. हे दोन्ही मतदारसंघ भाजपाचे बालेकिल्ला मानले जातात. या दोन्ही जागांवर आमचाच विजय होईल, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात होता.

हेही वाचा : ‘भाजपामधून बंडखोरी झाली नसती तर, मी पहिल्या फेरीत जिंकलो असतो’; विजयी जल्लोषात सरनाईक यांची प्रतिक्रिया

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number