मुंबई : राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी 'मल्हार सर्टिफिकेट' नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला. यामुळे नवी वादाला तोंड फुटले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंना थेट सवाल केला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेट नावाने नवा उपक्रम जारी केला आहे. त्यांच्या या नवीन धोरणानुसार हिंदू खाटिकांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडूनच मटण खरेदी करा. मात्र ज्या मटण विक्रेत्यांकडे मल्हार सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून मटण विक्री करू नका असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावर आता मच्छी खाताना कोणती खायची? हलाल, मल्हार की झटका? असा सवाल कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सगळं शांत सुरू असताना आग लावायची गरज काय?, कोणी कसं खावं, कधी खावं हे तुम्ही सांगणारे कोण? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंना केला आहे.
मल्हार सर्टिफिकेट म्हणजे काय?
मल्हार सर्टिफिकेट हे फक्त हिंदू समाजातील खाटिकांना दिले जाणारे प्रमाणपत्र आहे. या सर्टिफिकेटशिवाय कोणालाही मटण विक्री करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू खाटिकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी हे नवे धोरण लागू करण्यात येत आहे.
हेही वाचा :‘कमवा शिका’ योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये
हलाल म्हणजे काय?
हलाल म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार परवानगी असलेले अन्न आहे. या प्रक्रियेत प्राण्याला कमीत कमी त्रास सहन करावा लागतो. प्राणी बलिदान देताना देवाचं नाव घ्यावं लागते. एकाच प्रहारात धारदार चाकूने मारला जावा. मुस्लिम व्यक्तीने अल्लाहचे नाव घेत कत्तल करावी लागते.
झटका म्हणजे काय?
प्राण्याची मान एका झटक्यात वेगळी करणे. मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं जेणेकरुन जास्त वेदना होत नाही. मारण्यापूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जातं.