कर्जत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज, 28 ऑक्टोबर रोजी कर्जत येथील पोलीस मैदानावर जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांनी भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोडीविरोधात भूमिका घेत वृक्षतोड झालेल्या साय डोंगर परिसराची पाहणी केली. येथे 100 वर्षांहून जुनी झाडे मोठ्या प्रमाणावर कापण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या वृक्षतोडीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. राज ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. सह्याद्री वाचवा या मोहिमेखाली राज ठाकरे सायंकाळी कर्जतच्या पोलीस मैदानावर जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावर परखड मत मांडत सरकारला खडेबोल सुनावले.
काय म्हणाले राज ठाकरे –
राज्यामध्ये 23 नव्हे तर 236 प्रकल्प येत आहे, केंद्र सरकारच्या आदेशावरून हे प्रकल्प महाराष्ट्रात घुसवले जात आहे, असं सांगत राज ठाकरेंनी प्रकल्पाची यादीच वाचून दाखवली. कर्जतमध्ये इंटरनेट बंद करून ठेवलं तर सूर्य काय उगवणार नाही का, काहीही होणार नाही, इंटनेट बंद करून ठेवलं, पण या नेटवर्कचं काय करणार आहे. आता अर्ध्या तासामध्ये युट्यूबवर पडणार आहे. कोणत्या जगामध्ये राहतात, हे काही कळणार नाही. मनात काळं असलं ना तर अशा गोष्टी करायला सुचतं. जर सरकारचं मन चांगलं असतं तर असं केलं नसतं’, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकाराला टोला लगावला. झाडं तोडली तिथे गेलो होतो, तोडलेली झाडं ही रचून ठेवली होती, हे इतकं वाईट वाटलं मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय. इतक्या वर्षांची ती जुनी झाडं कोणत्या तरी गुजरात्यासाठी कापून टाकली जात आहे. भैय्या नाही तो गुजराती आहे. बरं त्यालाच मारा ना तुम्ही, या प्रकल्पाची गरज काय आहे, हा सगळ्यामागे एक षडयंत्र आहे, ते समजून घेतलं पाहिजे.
अधिकार पदावर बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील त्यांना केंद्रात बसलेले दोघे आहेत ना त्यांच्याकडे शून्य किंमत आहे. आम्ही जे सांगितलं ते महाराष्ट्रात झालं पाहिजे, हा जमिनीचा तुकडा त्यांना दिलं पाहिजे, आम्ही जे सांगितलं झालं पाहिजे. विधानसभेला सांगितलं होतं, ही दोन माणसं वाटेल ते करतील. आणि ही हिंमत येते कुठून, ही हिंमत येते तुमच्यामधून, अत्यंत जबाबदारीतून बोलतोय. आज रडत बसायचं, राजकीय पक्षाकडे जायचं, आमच्यावर अन्याय होतो. निवडणूक आली की जातीच्या नावावर धर्माच्या नावावर यांना मतदान करायचं, मग हे निवडून येणार आहे, वरंवटा फिरवणार आणि 5 वर्ष तेच करणार आहे. आपण कुणाला निवडून देतो हे यावरून आलं आहे. बाकी निवडणूक आयोग आहे. माता-बहिणींना लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये देऊन विकत घेतलं जात आहे. आता जो हैदोस घातला जात आहे, त्यावर कुणी बोललं नाही पाहिजे. यांच्या हातात काहीच नाही. आता मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंत केंद्राने आणि खासगी कंपनीने ठरवलं आणि हे काम सुरू झालं हे फडणवीस यांनीच सांगितलं. हे सगळं वरती केंद्रामध्ये ठरतं. हे उद्योगपती मोदी शाहांकडे जातात आणि जंगल आणि जमिनी मागतात, झाडं हटवून द्या, मग पोलिसांसारखं हे दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वागतात. गुजरातमधली दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार, आम्ही हतबल झालो आहोत.
पुढे राज ठाकरे यांनी नमूद केले की, अदानी हायड्रो, रिव्ह हायड्रो, मेगा इंजनियअरिंग, अदानीचे ३ प्रकल्प, जेएसडब्यू, अदानी, टोरंट, रिंको हे सगळे खासगी प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये टेडा सेंटर येणार आहे, त्यासाठी वीज लागणार आहे. या प्रकल्पाच्या बाजूला शहरं बसणार आहे, त्यांना विज लागणार आहे. कोळश्यावर चालणारी प्रकल्प 40 प्रकल्प येत आहे. 236, 40 आणि हे 23 प्रकल्प कुणासाठी आणत आहात, नीट जर पाहिलं तर तुमचे मतदारसंघ फोडत आहे. या पुढे तुम्ही कमी कमी होत जाणार आहात, त्यासाठी वीज हवी, रस्ते हवे आहे. आम्ही बेसावध आहोत, बाकी कोण पाहात आहे. जगात काय सुरू आहे पाहा. तरुणाचं आंदोलन झालं, सर्व्हे आला आहे, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आता सर्बिया नावाच्या देशात विद्यार्थ्यांनी सत्ता पालटावून टाकली आहे. जेन झी हे आता नाही, ते काही शहरात नाही, ग्रामीण भागामध्ये आहेत. सर्बियामध्ये हुकुमशहा होता, तिथे आंदोलन केलं की देशद्रोही होता, जे इथं सुरू आहे, तेच तिथे सुरू होतं. आम्ही काय करतो सहन करतोय, या आमच्यावर वरंवटा फिरवा, हे असं सुरू असेल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.