Saturday, August 16, 2025 08:32:46 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा बैठक

राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता काय करायला हवं याबाबत अजित पवारांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा बैठक

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. पुणे तसेच पिंपरीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. आरोग्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता काय करायला हवं याबाबत अजित पवारांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 'नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा: सांगलीत प्रहार संघटनेचं अर्धनग्न आंदोलन; बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'कोरोना पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीत काही रुग्ण आढळले आहेत. यावर आरोग्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथे काय करायला हवं याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, वयस्कर लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि गर्दीत जाणे टाळले पाहिजे. खोकला किंवा शिंक आल्यास रुमाल वापरणे गरजेचे आहे. याची काळजी घेतली पाहिजे'.


सम्बन्धित सामग्री