पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रकृती बिघडली; पंतप्रधान शाहबाज शरीफ रुग्णालयात दाखल

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून असे दिसते की, भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरले आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रकृती बिघडली; पंतप्रधान शाहबाज शरीफ रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. यावेळी, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून असे दिसते की, भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरले आहेत. आता हे देखील उघड झाले आहे की शहाबाज शरीफ यांना नेमकं काय झाले आहे आणि ते कधीपासून रुग्णालयात दाखल झाले आहेत.

हेही वाचा: भारतानं पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला खडसावलं; थेट संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत घेतला समाचार

पाकिस्तानी पंतप्रधान यांना काय झाले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना मूळव्याध असल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. शहाबाज यांना रावळपिंडीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या कागदपत्रांवरून उघड झाली आहे.

27 एप्रिलपासून शहाबाज शरीफ रावळपिंडीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांना मूळव्याध झाला आहे. रुग्णालयाच्या कागदपत्रांवरून त्यांच्या आजाराचे निदान आणि रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या कागदपत्रात स्पष्टपणे लिहिले आहे की पंतप्रधानाबद्दल मीडिया आणि लोकांना काहीही सांगू नये. रुग्णालयाने हे प्रकरण गुप्त ठेवण्यास सांगितले आहे.

भारताच्या भूमिकेला पाकिस्तान घाबरला

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रकृती वाईट असून संपूर्ण पाकिस्तानला याची चिंता आहे की भारत त्यांच्याबाबत काय करणार? मोदी सरकारने सर्वप्रथम सिंधू पाणी करार रद्द केला, त्यानंतर पाकिस्तानी व्हिसा रद्द केला आणि अटारी सीमा देखील बंद केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number